“नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात, संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं…”

Content Team
Published:

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या घरावर एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी (S.T Staff) हल्ला केला. या नंतर अनेक राजकीय स्तरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच काही भाजप (BJP) नेत्यांनी या आंदोलनाचे सर्वानी आश्चर्य व्यक्त केले आहे.

यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आव्हान केले होते. आता खुद्ध शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले, राज्य आपल्या हातात आलंय, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे. देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.

सतत काही ना काहीही करुन तीन्ही पक्षाला त्रास दिला जातोय. मात्र शेवटी आपली सामुहिक शक्ती तयार केली तर हे प्रयत्न हानून पाडू शरद पवार यांनी अप्रत्यक्ष पणे भाजपवर निशाणा साधला आहे.

गेले 40 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केल. कालच्या घरावरच्या हल्ल्यात कामगारांना दोष नाही, नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात. सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकवलं, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

तसेच नरसिंहराव यांच्या काळात दंगली झाल्या. दंगली नंतर मी महाराष्ट्रात आलो तेव्हा दंगली झालेल्या भागात मी जायचो. तेव्हा हिंदू- मुस्लीम दंगल घडवण्याचा डाव होता.

तेव्हा शुक्रवारी बॅाम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर सुरळीत सुरु केलं होतं. अशी संकट येतात त्यातून सावरावं लागतंय असेही पवार म्हणाले आहेत.

तसेच खिलारीला भुकंप झाला तेव्हा 800 लोक मृत्यूमुखी पडले होते, मोठं संकट आलं होतं. त्या संकटाच्या काळातंही सावरलं. एका महिन्यात प्रत्येकाची घरं बांधून दिली.

संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं त्याला तोंड द्यायचं असतं, कालचं संकट काही संकट नाही. त्याला महत्त्व द्यायचं नाही.

शरद पवार यांनी भाजपवरही जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले, काश्मीरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. आता एका चित्रपटात हिंदूंवर अत्याचार कसा होतो हे दाखवले. काश्मीर फाईल चित्रपट बघीतला पाहिजे असं आवाहन केंद्र सरकरने केलं.

तेव्हा देशात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होतं त्याला भाजपचा पांठिबा होता. याला भाजप जबाबदार आहे. हे देशाच्या एकतेला सुरुंग लावण्याचं काम आहे. याविरोधात लोकांनी एकत्र यायला हवं.

जातीयवाद, धर्मांच्या नावावर राजकारण करतात अशांच्या विरोधात उभं राहयचंय, असेही पवार म्हणाले. तसेच महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वत्र महागाई वाढते.

देशात बेरोजगारी आहे. सरकार देशाच्या समोरच्या प्रश्नाला सहकार्य करत नाही. तसेच कुणी राज्या-राज्यात संघर्ष निर्माण करत असेल तर एकत्र यायला हवं असेही पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe