Tips For Saving : पगार कमी असला तरीही करू शकता तुम्ही चांगली बचत, त्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Ahmednagarlive24 office
Published:

Tips For Saving : सध्याच्या काळात पैसे खूप महत्त्वाचा आहे. पैसे कमावण्यासाठी कोणी नोकरी करतो तर कोणी व्यवसाय करतो. नोकरी करत असणाऱ्यांना काही जणांना पगार कमी असतो तर काही जणांना पगार जास्त असतो. कमी पगार असणाऱ्यांना पैशाची बचत कशी करावी, असा मोठा प्रश्न त्यांना पडतो.

कमी उत्पन्नामुळे काही जण बचत करू शकत नाही. परंतु, आता कमी पगार असणारे लोकही चांगली बचत करू शकतात. त्यासाठी त्यांना काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर चांगली कमाई करू शकता.

लक्षात ठेवा या टिप्स

क्रमांक 1

तुम्हाला जर पगार कमी असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याचे बजेट बनवा. तुम्हाला किती खर्च करावा लागणार, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये इ. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि याद्वारे बचत करा.

क्रमांक 2

जर तुम्हाला कपडे किंवा अशी कोणतीही वस्तू घ्यायची असल्यास तुम्ही ऑफर्सची काळजी घेऊ शकता. कारण, तुम्ही सणांच्या निमित्ताने किंवा सीझन आणि सेलसारख्या ठिकाणांहून खरेदी करून खूप पैशांची बचत करू शकता.

क्रमांक 3

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या पगारापेक्षा जास्त खर्च करू नका. काहीजण प्रत्येक महिन्याला पगार येण्याआधीच कोणाकडून पैसे उधार घेऊन पैसे खर्च करतात त्यानंतर त्यांचा पगार कर्ज फेडण्यासाठी जातो. त्यामुळे तुमचा पगार विनाकारण खर्च करणे टाळा.

क्रमांक 4

आता जेव्हा तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करता तेव्हा गुंतवणूक करत जा. त्यामुळे जर तुमचा पगार कमी असला, तरी तुम्ही थोडी रक्कम गुंतवावी. तुम्ही दरमहा काही पैसे वाचवून गोल्ड, एलआयसी किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe