‘हिंदुत्ववादी’ सत्तारांची शपथेतही ‘बंडखोरी’, ती पद्धत टाळलीच

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुतत्वाच्या रक्षणासाठी आपण बंडखोरी केली असे इतर आमदारांसोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार हेही सांगत होते.

अलीकडे हिंदुत्ववादी मुस्लिम म्हणून त्यांना ओळखण्यात येऊ लागले आहे. आज शपथ घेताना मात्र त्यांनी हिंदुत्ववादी पद्धतीला फाटा दिल्याचे दिसून आले.

इतर सर्वांनी ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली तर सत्तार यांनी ‘गांभीर्यपूर्ण दृढ कथन करतो’, अशी पुरोगामी पद्धतीने शपथ घेतली. मंत्रिपद हुकण्याची शक्यता निर्माण झाली असताना अखेर सत्तार यांना हे पद मिळाले.

हिंदुत्वावाचा पुकारा करणारे सत्तार शपथ कोणत्या पद्दतीने घेणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी ईश्वर किंवा अल्ला यांचा उल्लेख टाळून पुरोगामी लोक घेतात त्या पद्धतीने शपथ घेतली.

शपथविधीच्या वेळी राज्यपालांना घेऊन मंचावर आल्या आल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वतीने सर्वांना सूचना केली होती,

की शपथेशिवाय दुसरे काहीही म्हणायचे नाही. त्यामुळे मागील वेळेप्रमाणे घोषणाबाजी टळली. काही मंत्री थोडोफार अडखळल्याचे सोडले तर शपथविधी सुरळीत पार पडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe