शेवटी मृत्यूने ‘त्या’ चिमुकलीला गाठले; जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे म्युकरमायकोसीस संकटाचे ढग जिल्ह्यावर दाटून आले.

यातच नुकतेच शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोना नंतर म्युकरमायकोसिस या आजराची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.

शिर्डी शहरातील श्रद्धा कोरके या साडेपाच महिन्याच्या चिमकुलीला प्रथम करोना आणि नंतर म्युकरमायकोसीस चा संसर्ग झाला होता. नाशिकनंतर लोणीतील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात श्रद्धावर उपचार सुरू होते.

रविवारी 13 जूनला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथे बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. आल्यापासून श्रद्धाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. बुरशीचा संसर्ग वाढून चेहर्‍यासह अन्य अवयवांवर पसरला होता.

ती औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हती. मोठया रुग्णांमध्ये बुरशी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. मात्र, रुग्णाचे वय व प्रकृती विचारात घेता तोही शक्य नव्हता.

त्यामुळे औषधोपचाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. श्रद्धा ही येथे दाखल झाल्यापासून तिने उपचारांना प्रतिसाद दिलाच नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. १० जूनपासून सुरु असलेली त्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज आज अपयशी ठरली व तिची प्राणज्योत मालवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe