पुणे : सध्या देशात धर्माचे राजकारण जोर धरू लागले आहे. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले आहे त्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन सोहळ्यात मोठे विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले, आज भारतातला सगळ्यात प्रीव्हीटीव्ह ट्रायब म्हणून जे अंदमानचे आदीवासी आहेत, ते असतील, किंवा बंगलमद्ये राहणारे ब्राम्हण असतील.
किंवा साऊथमध्ये राहणारे नायर असतली. किंवा उत्तर प्रदेशात राहणारे ज्यांना आपण दलीत समाजाचे म्हटले आहे, असे असतील. या सगळ्यांचा डीएनए एकच निघाला. हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, त्यामुळे ही सगळी थिअरी की जो कुणीतरी आर्य आहे, कुणीतरी द्रवीड (Arya Dravid Theory) आहे. कुणीतरी ब्राम्हण आहे. कुणीतरी शुद्र आहे. हे सगळं संपलं आहे.
हे कुठेतरी मानवनिर्मित आहे. आणि हे काही लोकांनी नंतरच्या काळात आपल्या फायद्यासाठी वापरलं, तसेच इंग्रजांनी त्याला भारतावर राज्य करण्याकरता वापरलं, अशी सगळी थिअरी आज आपल्या समोर आहे असे वक्तव्य केल्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा सुरु आहे.
या डीएनएचा (DNA) वापर करून काही लोक युरोपात गेले. इतर ठिकाणी गेले, त्यामुळे ही थिअरी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भारतात राहणारे सर्व एकाच डीएनएचे आहेत. आपल्या देशाला पारतंत्र्यात टाकण्यासाठी भारतीय समाजाचा तेजोभंग केला गेला. आत्मभान आणि आत्मतेज हरवतं तेव्हा माणसाला लवकर गुलाम करता येतं. राम मंदिरावर, श्रीकृष्ण भूमीवर त्यामुळे मुघल आणि इतरांनी हल्ले केले.
कारण भारतावर आक्रमण करण्याला हे सर्व माहिती होतं त्यामुळे हे सर्व झालं, तसेच आमचा विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न झाला. आमचा ईश्वर, आमची संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ हेच दाखवण्यासाठी हे केलं गेलं.
अन्यथा ते लोकं बाबरी मशीद दुसऱ्या ठीकाणी बाधू शकले असते. तुम्ही ताजमहल बाधू शकता तर मशीदही बाधू शकला असता, मशीद बांधणे हे उदीष्टच नव्हतं, भारतीयांचा तेजोभंग करण्याचा हा प्रयत्न होता असेही फडणवीस म्हणाले आहेत.