Maruti Alto 800 : मारुती अल्टो 800 ही सर्वात जास्त मायलेज देते आणि देशातील सर्वात स्वस्त कार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 3.15 लाख ते 4.82 लाख रुपये मोजावे लागतील.
परंतु, तुम्ही ही कार फक्त 54 हजार रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कंपनीने या कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. तसेच तुम्हाला या कारवर सुमारे 55 हजारांपर्यंत सूट मिळू शकते काय आहे ही धमाकेदार ऑफर जाणून घेऊयात.

किती आहे किंमत
मारुती अल्टो 800 या मॉडेलची किंमत 3,39,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 3,78,757 पर्यंत जाते.
किती मिळत आहे सूट
जर तुम्ही मारुती अल्टो 800 31 डिसेंबर 2022 अगोदर विकत घेतली तर कंपनी या कारवर 55,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटही मिळत आहे.
फायनान्स प्लॅन
या कारच्या ऑन रोड किंमतीनुसार, जर तुम्ही ही कार कॅश पेमेंटद्वारे खरेदी केली तर तुमचे बजेट जवळपास 3.79 लाख रुपये असावे. परंतु, जर तुम्ही कार फायनान्स प्लॅनद्वारे घेतली तर ती 30,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी नेऊ शकता.
समजा तुमचे बजेट 54,000 रुपये असेल, तर फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या कॅल्क्युलेटरनुसार, बँक तुम्हाला या कारसाठी 3,24,757 रुपयांचे कर्ज देऊन यावर वार्षिक 9.8 टक्के दराने व्याज आकारेल. कर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला पुढच्या 5 वर्षांसाठी दर महिन्याला 6,8658 रुपये मासिक ईएमआय जमा करावा लागेल.
इंजिन आणि ट्रान्समिशन
कंपनीने यामध्ये 796 cc चे तीन सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 47.33 बीएचपी पॉवर आणि 69 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये उपलब्ध आहे.
मायलेज
मायलेजबाबत कंपनीचा असा दावा आहे की ही हॅचबॅक 22.05 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.