पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येवेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली आहे.
तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे. मनसेचा पहिल्यांदाच वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर घेण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले, ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो.
सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला.
डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत.
भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असे म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल करत खिल्ली उडवली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ‘निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल.
वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही.
मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही.
निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापालिका निवडणुकीवरून निशाणा साधला आहे.