फेसबुकचे नाव बदलले… जाणून घ्या काय आहे नवीन नाव

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म असलेले फेसबुकच्या नावात बदल करण्यात आला आहे. याबाबत फेसबुकचा संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने याविषयी माहिती दिली.

दरम्यान कंपनीच्या वार्षिक सभेत याविषयीची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात बोलत असताना, झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकचे नवे नाव ‘मेटा’ असे असेल अशी माहिती दिली.

फेसबुकचे नाव बदल्यानंतर झुकरबर्ग यांनी हॅलो, मेटा, असं म्हणत युजर्सशी संवाद साधला. सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत पत्ररुपी संवाद साधला आहे. ते म्हणाले, आम्ही इंटरनेटसाठी पुढच्या अध्यायाच्या सुरुवातीला आहोत आणि आमच्या कंपनीसाठीही हा पुढचा अध्याय आहे.

अलिकडच्या दशकांमध्ये, तंत्रज्ञानाने लोकांना जोडण्याची आणि स्वतःला अधिक नैसर्गिकरित्या व्यक्त करण्याची शक्ती दिली आहे. जेव्हा मी फेसबुक सुरू केले, तेव्हा आम्ही बहुतेक वेबसाइटवर मजकूर टाइप करतो. जेव्हा आम्हाला कॅमेरे असलेले फोन मिळाले, तेव्हा इंटरनेट अधिक मोबाईलच्या माध्यमातून दृश्यमान झाले.

जसजसे कनेक्शन जलद होत गेले, तसतसे अनुभव शेअर करण्याचा व्हिडिओ हा एक समृद्ध मार्ग बनला. आम्ही डेस्कटॉपवरून वेबवर मोबाइलवर गेलो आहोत; मजकूर ते फोटो ते व्हिडिओ.

आमच्याशी जसे फेसबुकच्या माध्यमातून कनेक्ट झालात. त्याचप्रमाणे पुढेही कनेक्ट राहा. आमचे मेटाव्हर्ससाठी Connect 2021 हे आमचे व्हिजन असणार आहे. आता आपण मेटाच्यामाध्यमातून भेटत राहू. पुढील प्लॅटफॉर्म आणखी इमर्सिव्ह असेल असेल असे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe