Fact Check: आजचे युग हे सोशल मीडियाचे (social media) आहे आणि त्यातील कोणतीही छोटी गोष्ट देश-विदेशात खूप वेगाने पसरते. उदाहरणार्थ, अगदी दुर्गम गावातूनही कोणतीही बातमी आली तर ती पसरायला वेळ लागत नाही आणि हे सगळं सोशल मीडियामुळे घडतं.
पण अडचण तेव्हा येते जेव्हा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्याही कोणत्याही तपासाशिवाय पसरू लागतात. त्यामुळेच या बातम्यांच्या तळाशी जाऊन त्यांची सत्यता शोधणे अत्यंत गरजेचे आहे. असाच एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मतदान न (voting) केल्यास बँकेतून पैसे (bank account) कापले जातील, असे म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया या मेसेजमध्ये किती तथ्य.
आहे मेसेजमध्ये काय आहे ?
वास्तविक, सोशल मीडियावर वर्तमानपत्रातील एक कटिंग व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही मतदान न केल्यास बँक खात्यातून पैसे कापले जातील, असे म्हटले आहे. व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘मत न दिल्यास बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील: निवडणूक आयोगाने (Election Commission) यापूर्वीच न्यायालयाची मंजुरी घेतली आहे ‘लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) यावेळी मतदान न करणे महागात पडेल’, असेही संदेशात लिहिले आहे.
मतदान टाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने हा नवा आदेश जारी केला आहे. याशिवाय ‘खाते नसेल तर मोबाईल रिचार्जमधून पैसे कापले जातील’, असेही मेसेजमध्ये ठळक अक्षरात लिहिले आहे. म्हणजे ज्या लोकांचे बँक खाते नाही, त्यांच्या मोबाईल रिचार्जमधून पैसे कापले जातील.
सत्य जाणून घ्या
मतदान न केल्याबद्दल बँकेतून 350 रुपये कापल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. हे पूर्णपणे बनावट आहे. न्यायालयाने अशी कोणतीही मान्यता दिलेली नाही किंवा निवडणूक आयोग किंवा सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले नाही. या दाव्याची चौकशी करताना पीआयबीने (PIB) स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासोबतच लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या शेअर करू नयेत, असेही पीआयबीकडून सांगण्यात आले आहे.
हा मेसेज फेक आहे
निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याच्या ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, “आमच्या लक्षात आले आहे की खालील बनावट बातम्या काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स (WhatsApp groups) आणि सोशल मीडियावर पुन्हा शेअर केल्या जात आहेत. 2019 मध्येही अशा फेक न्यूज व्हायरल झाल्या होत्या. अशा परिस्थितीत या मेसेजबाबतचा निष्कर्ष असा आहे की, मतदान न करण्यासाठी बँक खात्यातून पैसे कापणारा मेसेज खोटा आहे आणि तसे काही नाही. त्यामुळे विश्वास ठेवू नका.