फडणवीस नटसम्राट आहेत ! ही प्रथा त्यांनीच पाडली; नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

Content Team
Published:

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ (Pendrive bomb) टाकला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मंत्र्यांची नावे घेऊन खळबळ निर्माण केली आहे.

याबाबत फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळून लावत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, जे काही व्हिडिओज Videos) विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असा पलटवार फडणवीसांवर त्यांनी केला आहे.

तसेच यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची (Bjp) आहे. फडणविस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या आरोपांना उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील, या व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे.

त्यामुळे व्हिडिओची डबिंग (Video dubbing) झालेली असू शकते, अशी शंकाही यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या पेनड्राईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin chavan) यांचे काही व्हिडीओ रेकॉर्डचे (video record) दाखले देऊन त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये त्यांनी सुमारे १२५ तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला आहे. यामध्ये व्हिडिओमधील महाविकास आघाडीतील नेत्यांचे संवाद फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe