भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाने पेट घेतला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जोरदार सभा झाली. तसेच मुंबईत भाजपची (BJP) बुस्टर सभा झाली.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला आहे. तर राज ठाकरे यांनी देखील औरंगाबाद येथे सभा गाजवली आहे. आता महाविकास आघाडीतील नेते याला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फडणवीस बोलताना म्हणाले, भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, बाबरी पाडल्याच्या 32 आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार,

साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती, असंही फडणवीस म्हणाले.

हनुमान चालिसा आता राजद्रोह होतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे? हनुमान चालिसाने केवळ रावणाचे सरकार उलथवले जाते, रामाचे नाही. आता सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या? असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेला केलाय.

या देशात एक वाघ तयार झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने, ज्यांनी कलम 370 रद्द करून दाखविले. आता शिवसेना म्हणते, तुम्ही पाकिस्तानबद्दल काय बोलता, चीनबाबत बोला ना. काय अवस्था झाली शिवसेनेची?

आज पत्रकारांवर हल्ले कारवाया सुरु आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह अन्य नेत्यांवर हल्ले झाले. माध्यमांवर किती बंधने? आणीबाणीची अवस्था आणून ठेवली या महाविकास आघाडी सरकारने.

मुख्यमंत्र्यांची आजची मुलाखत म्हणजे पुन्हा तेच टोमणे. दंतकथा, धक्का, पाठीत वार, खेळ, मार्केटिंग, भोंगे-पुंगी, माकडचाळे, बेडुकउड्या, पोटदुखी, बुद्धीबळ, चिरडणे, लढणे, मरणे, रडणे, पीडित, चाटण, बागुलबुवा, हात तोडणे, तमाशे, पोळी, बोंबा, नौटंकी.

आज महाराष्ट्र दिनी सरकार कुठला निर्णय घेईल असं वाटलं होतं, पण ही अपेक्षा फोल ठरली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe