Cashew Check : बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाताहेत बनावट काजू, या सोप्या पद्धतीने ओळखा असली काजू

Cashew Check : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे अनेकजण सुका मेवा नियमितपणे खातात. मार्केटमध्येही सुक्या मेव्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काहीजण यामध्ये भेसळ करत आहेत.

त्यापैकी नफा मिळवण्यासाठी भेसळयुक्त काजू विकत आहेत. तुमच्यापैकी अनेकजण बनावट काजू खात असतील. तुम्हाला आता घरच्या घरी बनावट आणि असली काजू कोणता समजू शकते.

काजूचा रंग पाहून तो बनावट आहे की असली ते समजते.  असली काजूचा रंग पांढरा तर बनावट काजूचा रंग पिवळा असतो.

जेव्हा तुम्ही काजू खरेदी करता तेव्हा त्याची गुणवत्ता निश्चितपणे तपासा. असली काजू दर्जेदार असून ते 1 इंच लांब आणि जाड असतात. तर बनावट काजूच्या आकारात खूप फरक असतो.

एवढेच नाही तर तुम्ही काजूच्या वासावरून ते असली आणि बनावट ओळखू शकता. असली काजूला संधि आणि भिणीचा सुगंध येतो. तर नकली काजूचा वास घेतला तर त्याचा तेलासारखा वास येतो.

असली काजू खाताना ते दातांना अजिबात चिकटत नाही. रसेच तुम्ही नकली काजू खाल्ले तर ते दातांमध्ये सहज चिकटतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe