अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Money News :- देशातील सर्व नवयुवकांचे शिक्षणानंतर नोकरी करण्याचे स्वप्न असते. शेतकरी पुत्र देखील आता शेती मागे न धावता नोकरी करण्यासाठी अधिक धावपळ करताना बघायला मिळतात.
वर्षानुवर्ष शेतीमधून शेतकऱ्यांना (Farmer) तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी पुत्र आता नोकरीकडे जास्त आकृष्ट होत असल्याचे बघायला मिळत आहे.
मात्र, देशात असेही अनेक तरुण आहेत जे की उच्चशिक्षित असून देखील शेतीकडे मोठ्या आशेने बघत आहेत आणि विशेष म्हणजे अशा तरुणांना काळी आई भरभरून उत्पन्न देखील देत आहे.
हरियाणा राज्यातील (Hariyana Successful Farmer) एक नवयुवक देखील उच्चशिक्षित असूनही नोकरी न करता बटन मशरूमची लागवड (Mushroom Farming) करून चांगला बक्कळ पैसा कमवत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा नवयुवक महिन्याकाठी सुमारे 40 लाखांची उलाढाल करत आहे.
हरियाणा मध्ये राहणाऱ्या नवीन यांनी आधुनिकतेची कास धरली आणि नोकरी न करता मशरूम शेती यशस्वी करून दाखवली.
नवीन सांगतात की, 2019 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञानात बी.एस्सी. पास आऊट झाल्यानंतर त्याने नोकरीला पसंती दर्शवली नाही.
नोकरी न करता त्याने त्याच्या मोठ्या काकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि बटन मशरूम लागवड (Button mushroom planting) केली.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, त्याचे मोठे काका 1996 पासून मशरूमची लागवड करत आहेत. यामुळे नवीन यांना त्यांचे काकाचे नेत्रदीपक यश पाहता नोकरी न करता मशरूमची शेती करावी असे वाटले.
नवीन सांगतात की, जर त्यांनी नोकरी केली असती तर कदाचित महिन्याला 35-40 हजार रुपये जेमतेम मिळाले असते, पण आता ते लाखो रुपयात कमाई करत आहेत.
याशिवाय नवीन त्यांच्या गावातील लोकांना रोजगारही देत आहेत यामुळे नोकरी करण्यापेक्षा त्यांना यामध्ये अधिक सुख मिळत आहे. नवीन मशरूम शेती (Mushroom Cultivation) साठी रोजाना 15 लोकांना हाताला काम देत आहेत.
नवीन यांनी 2500 चौरस क्षेत्रात मशरूम लागवड केली आहे. नवीन यांच्या मते, मशरूम शेतीमधून एकूण व्यवसायाच्या 20% पर्यंत नफा मिळतो. म्हणजेच चाळीस लाखांचा महिन्याकाठी मशरूम शेतीतून व्यवसाय होत असेल तर नवीन यांना आठ लाखांची महिन्याला कमाई होत आहे.
निश्चितच नवीन यांनी केलेला हा नवीन प्रयोग सुशिक्षित तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मित्रांनो आम्ही देखील आपणास सांगू इच्छितो की, जर आपला मशरूम शेती करण्याचा विचार असेल तर सर्वप्रथम या शेतीसाठी आवश्यक आहे ती ट्रेनिंग.
आपण या शेतीसाठी आवश्यक ती ट्रेनिंग घेऊन निश्चितच त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. नवीन यांनीदेखील इच्छुकांना ट्रेनिंग घेण्याचे आव्हान केले आहे.