अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यातच पेरणीच्या कामाला देखील अनेक ठिकाणी सुरुवात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
यातच पिकांसाठी आवश्यक खते खरेदीसाठी कृषी केंद्रवार शेतकरी पहाटेपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची कमतरता भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर मोठी गर्दी केली आहे.
शेतकरी आपला जीव धोक्यात घालत मोठ्या रंगांत उभे राहून खत खरेदी करत आहे. यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा उडाला आहे,
दरम्यान खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची तालुक्यात अनेकदा कमतरता भासत असल्यामुळे पाणी असूनही पिकांचे खताअभावी नुकसान झाले आहे. पिकांना वेळीच खते देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली आहे.
कृषी केंद्राबाहेर सकाळपासूनच रांगा लागत आहे. त्यामुळे कोरोनाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. वेळीच या खत विक्रीचे नियोजन प्रशासनाने करावे अशी मागणी होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम