अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरडवाहू शेतीसाठी हरभरा हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घेत लागवड करावी. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि भारतीय कृषि अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने कडधान्य उत्पादन वाढ अंतर्गत हरभरा समुह प्रथमदर्शक कार्यक्रमाच्या निमित्ताने केलवड येथे आयोजित कृषि दिन कार्यक्रमात शैलेश देशमुख बोलत होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्यावतीने कडधान्यांची उत्पादकता वाढवी, नवे वाण, नवीन तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा या कार्यक्रमचा उद्देश असतो, असे देशमुख यांनी सांगून यावर्षी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संशोधित फुले विक्रम हा वाण शेतकर्यांना देण्यात आला आहे.
इतर वाणांच्या तुलनेत रोग प्रतिकार क्षमता जास्त उभट वाण आणि उत्पादन देखिल जास्त आहे. यांच्या शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे.
बदलत्या हवामानाचा विचार करतांना शेतकर्यांनी पिकसंरक्षण समजून घ्यावे. एकात्मिक किड नियंत्रण बिज आणि रोप प्रक्रिया करावी.
या कार्यक्रम प्रसंगी सुभाष गमे, भरत दंवगे, बाळासाहेब गमे, वाल्मीक गमे, विजय गोर्डे, भाऊसाहेब गमे, भागवत गमे, काकासाहेब गमे, अमोल कहांडळ आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम