Shevgaon News : शेवगाव तालुक्‍यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! शासकीय कांदा खरेदी…

Updated on -

Shevgaon News : शेवगाव तालुक्‍यातील ढोरजळगाव येथे महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि.या राज्यस्तरीय अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून वृध्देश्वर अँग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कांदा खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे अवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सद्स्य बापुसाहेब पाटेकर यांनी केले आहे.

महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि.या राज्यस्तरीय अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून वृध्देशवर अँग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ढोरजळगाव येथे कांदा खरेदी केंद्राचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बापुसाहेब पाटेकर यांच्या व भाजपा.युवा मोर्चा सारचिटणीस गणेश कराड यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी पाटेकर बोलत होते.

पाटेकर पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या किंमत स्थिरिकरण योजना (पीएसएफ ) २०२३ अंतर्गत महाराष्ट्रात नॅशनल ‘को- ऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशन ( एनसीसीएफ) आणि नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर एक्सपोर्ट ड्युटी ४० टक्के लावल्यामुळे कांदा दरात घसरण झाली.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या मार्फत महाराष्ट्रात दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा एक नंबर दर्जाचा कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.

शुक्रवार दि.२५ ऑगस्ट रोजी ढोरजळगांव येथे कांदा खरेदीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २४१०. ७५ किंटल दर मिळाला असुन तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या कांदा खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे अवाहन पाटेकर यांनी केले.या खरेदीसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे व महासंघ फार्मस प्रोडूसर कंपनीचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe