शेतकऱ्याने शेतासमोरच सुरू केले फळविक्री केंद्र; फळ विक्रीतून मिळवला अधिकचा नफा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली आसून शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते.

त्याचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशा पडते. यावर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे.

त्याने ना वाहतूकीची खर्च, ना व्यापाऱ्यांची कवडीमोल दरात केलेली मालाची मागणी.थेट शेतकरी ते ग्राहक. यासाठी त्यांनी आपल्या शेतासमोरच फळविक्री केंद्र सुरु केले आहे.

ग्राहकांना परवडेल आणि स्वत:चा खर्च निघेल या उद्देशाने त्यानी फळविक्री केंद्राला सुरूवात केली. तर त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादहीम मिळत आहे.

शिवाय त्यानी शेतात टरबूज आणि खरबूजाची लागवड सेंद्रीय पध्दतीने केली आसल्यामुळे या केंद्रावरील फळांना ग्राहकांनी अधिकची पसंती दिली.

शिवाय थेट शेतकऱ्यांकडून फळे मिळत असल्याने व्यापाऱ्यांपेक्षा स्वस्त असणार ही ग्राहकांची भावना झाली आहे.व त्याचा फायदा शेतकऱ्याला अधिकचा नफा मिळण्यास झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe