शेतकऱ्यांनी घ्या ठिंबक सिंचन योजनेचा लाभ; 80 टक्के सबसिडी होणार ‘या’ दिवसातच जमा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi Marathi  :- शेतकऱ्यांला शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज लागते. तर हेच पाणी कमी पडले की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील घट होती.तर ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यात योग्य पाण्याचे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.

या योजनेत दर वर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेतून 80 टक्‍के अनुदान दिले जात आहे.

तर हे अनुदान अवघ्या 13 दिवसात जमा होणार आहे. तर करमाळ्यातील काही शेतकऱ्यांना अवघ्या 13 दिवसांत अनुदान मिळाले आसून ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढावे,

पाण्याचा अपव्यय टाळता यावा, जमिनीची सुपिकता कायम टिकून राहावी, या हेतूने ठिबकचे अनुदान आता वाढ करण्यात आले आहे. ही योजना महाडीबीटीच्या माध्यमातून कोणताही शेतकरी घरबसल्या त्यासाठी अर्ज करु शकतो.

ठिबक बसविल्याची पडताळणी झाल्यानंतर त्याचा अनुदानाचा अर्ज मंजूर होतो. त्यांना काही दिवसांत अनुदान वितरीत केले जाते. ठिबकचे अनुदाना साठी पाच हेक्‍टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा आहे.

अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 45 टक्‍के तर लहान शेतकऱ्यांना 55 टक्‍के आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून मोठ्या शेतकऱ्याला 35 टक्‍के तर लहान शेतकऱ्यांना 35 टक्‍के अनुदान मिळते.

2021-22 मध्ये अर्ज केलेल्या 18 हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास साडेआठ हजार शेतकऱ्यांना 22 कोटींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe