अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील
यांनी सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राहुरीत शेतकऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी खा.विखे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जिरायती नोंद आहे.
मात्र त्या जर बागायत असतील तर सर्व जमिनींची बागायत म्हणून नोंद करण्याचे आदेश दिले. पोटखराबा असेल तर त्या ठिकाणी देखील बागायत नोंद घेण्यात येईल.
जेणेकरून या जमिनींचे मूल्यांकन दुपटीने वाढेल.शेतकºयांच्या जमिनीमधून जाणारे सायपन, त्याचे पाईप व सध्या उभी असलेली सर्व पिके या सर्व गोष्टींची नोंद घेऊन त्याचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल.
महाराष्ट्र शासनाने नवीन काढलेले परिपत्रक ज्यामध्ये मूल्यांकन व भूसंपादन करण्याची जी रक्कम कमी केली होती. ती विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरत-हैदराबाद रस्त्यासाठी ती अट काढून नेहमीप्रमाणे नॅशनल हायवेच्या मूल्यांकनावर सध्या नगर-सोलापूर-नगर बायपास नगर उड्डाणपूल भूसंपादनसाठी जे नियम होते.
त्याच नियमाप्रमाणे या हायवेसाठी मल्टिप्लिकेशन फॅक्टर वापरून जमिनी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी सर्विस रोड देण्यात येईल.
सध्या कुठल्याही प्रकारची मोजणी सुरू झालेली नसून ‘थ्री कॅपिटल ए’ काढणे म्हणजे केवळ ढोबळ जमिनीची नोंद किंवा ढोबळ गटाचा उल्लेख करणे हा असून नॅशनल हायवे सध्या केवळ पोल निश्चित करून तेथील हद्द निश्चित केले जात आहे.
सध्या कुठल्याही प्रकारे जमिनीची मोजणी किंवा भूसंपादन होणार नाही. म्हणून जोपर्यंत भूसंपादन जमीन किती आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास
त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेऊन अडचणी सोडवल्या जातील आणि सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतले जातील असा निर्णय बैठकीत घेतला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम