आमरण उपोषण ! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

Ahmednagarlive24 office
Published:
Sambhaji Raje Chhatrapati's

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केले आहे.

आज ते मुंबईत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली.

परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं.

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण दिलं. त्यामध्ये अनूसूचित जाती, अनूसूचित जाती, ओबीसी आणि मराठा समाज यांचा समावेश होता. 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यावेळी मराठा समाज हा बहुजन समाजाचा भाग आहे.

मराठा समाज आणि बारा बलुतेदारांना एकत्र कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न केला. 5 मे 2021 ला मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं.

त्यानंतर आंदोलनं केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, आक्रमक आंदोलन केली. मात्र, आता उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही.

ज्यावेळी आरक्षण रद्द झालं त्यावेळी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपलं आरक्षण रद्द कसं झालं यासंदर्भात राजकीय नेत्यांसमोर भूमिका माडंली.

समन्वयक यांनी मला सांगितल टोकाची भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. परंतु सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही.

त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe