DCB Bank FD and Saving Account Rates : सध्या प्रत्येकजण एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे, अशातच तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला वेगवगेळ्या बँकेतील एफडी दर माहित असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुमच्यासाठी DCB बँकेचे व्याजदर घेऊन आलो आहोत.
DCB बँकेने नुकतेच बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याज सुधारित केले आहे. आरबीआयच्या पतधोरण बैठकीपूर्वी डीसीबी बँकेने त्यांच्या व्यजदरात वाढ केली आहे. आरबीआयची ही बैठक 4 ते 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. DCB बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदर शिल्लक रकमेवर अवलंबून असतो. 27 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. चला बँकेचे बचत आणि एफडीचे नवीन दर जाणून घेऊया…

DCB बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदर
-1 लाखापर्यंतच्या खात्यातील शिल्लक वर 1.75%
-1 लाखांपेक्षा जास्त ते रु. 2 लाखांपेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 3%
-2 लाख ते 5 लाखांपेक्षा कमी खात्यातील शिल्लक रकमेवर 3%
-5 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमी खात्यातील शिल्लक रकमेवर 5.25%
-10 लाख ते 2 कोटी पेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 8%
-2 कोटी ते 5 कोटी पेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 5.50%
-5 कोटी ते 10 कोटी पेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 7.00%
-10 कोटी ते 50 कोटी पेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 7.75%
-50 कोटी ते 200 कोटी पेक्षा कमी खात्यातील शिल्लक वर 7.75%
-200 कोटी आणि त्यावरील शिल्लक रकमेवर 5.50%
DCB बँकेने FD वर सुधारित दर
देशातील खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या DCB बँकेने सप्टेंबरच्या सुरुवातीला 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली होती आणि आता त्यात सुधारणा केली आहे. बँकेचे हे नवे दर 27 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
बँक सर्वसाधारण ग्राहकांना 3.75 टक्के ते 7.75 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 120 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 4.25 टक्के ते 8.50 टक्के व्याज देत आहे. DCB बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8.50 टक्के व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे.
DCB बँकेचे FDवरील व्याजदर
-बँक आता 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीच्या FD वर 4.00 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 91 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.75 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 6 महिने ते 10 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 6.25 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 10 महिने ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.25 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 12 महिने ते 12 महिने 10 दिवसांच्या FD वर 7.15 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 12 महिने आणि 10 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 12 महिने 11 दिवस ते 18 महिने 5 दिवसांच्या FD वर 7.15 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 18 महिने, सहा दिवस ते 700 दिवसांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 700 दिवस ते 25 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.55 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 25 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 7.90 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 25 महिने ते 37 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.60 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 37 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 7.90 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 37 महिने ते 61 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.40 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 61 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 7.65 टक्के व्याज देत आहे.
-बँक आता 61 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.25 टक्के व्याज देत आहे.