FD Rates Hike : तुम्ही देखील कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी एफडीमध्ये गुतंवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशातील मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या एफडी दरामध्ये वाढ केली आहे.
या नियामुळे आता हजारो लोकांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही देखील या बँकेत एफडीमध्ये गुतंवणूक करत असाल किंवा करणार असाल तर जाणून घ्या नवीन दराबद्दल ज्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. हे नवे दर 19 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. ताज्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8% पेक्षा जास्त व्याज मिळेल.

बँकेने जारी केलेल्या तपशिलानुसार, 666 दिवसांच्या कालावधीच्या FD वरील व्याज 95 बेसिस पॉइंट्सने वाढवण्यात आले आहे. त्याच वेळी, 3 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवण्यात आला आहे. व्याजदरांच्या घोषणेनंतर, सामान्य लोकांसाठी FD वर जास्तीत जास्त व्याज दर 7.25% आहे. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी PNB FD दर 8.05% आहेत. हा व्याजदर 666 दिवसांच्या कालावधीसाठी परिपक्व ठेवींवर उपलब्ध असेल.
FD वर वाढलेले व्याजदर
PNB 7-45 दिवसांच्या कालावधीसाठी ठेवींवर 3.50% व्याज देत आहे. आणि 46 ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याज दर 4.50% आहे. 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50% व्याज दिले जात आहे. 1 वर्ष ते 599 दिवसांच्या कालावधीसाठी FD वर 6.30% p.a. व्याज चालू राहील.
व्याज वाढल्यामुळे स्टॉक तुटला
त्याचप्रमाणे PNB च्या 600 दिवसांच्या FD वर 7% वार्षिक व्याज मिळेल. तर 601 ते 665 दिवसांच्या ठेवीवर 6.30% व्याज मिळेल. त्याच वेळी, 2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.25% वार्षिक व्याज दिले जात आहे. नवे दर 19 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. BSE वर PNB स्टॉक (PNB Stock Price) 2.5% च्या घसरणीसह Rs 54 वर व्यापार करत आहे.
हे पण वाचा :- Pan Card : पॅन कार्ड चोरीला गेला तर टेन्शन घेऊ नका ‘या’ पद्धतीने बनवा नवीन कार्ड ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया