अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून भक्ष्याच्या शोधात तसेच पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलातून मानवीवस्तीकडे येऊ लागल्याचे दिसून येत आहे.
यातच अनेकदा वाहनाच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर शहरात एक मादी जातीचे हरीण मृतावस्थेत आढळले.
या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर परिसरात आज बुधवारी सकाळी हरीण मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शहराला लागून शेती महामंडळाची टिळकनगर मळ्याची मोठ्या प्रमाणावर जमीन आहेत.
या ठिकाणी अलीकडच्या काळात हरणांचा वावर सुरु होता. तसेच दुधाळ वस्ती, खंडागळे वस्ती, बेलापूर ते दिघी रोड व बेलापूर परिसरात बिबट्याचाही वावर आहे.
त्यातच आज येथील लोकवस्तीत पहाटे मृतावस्थेत हरीण आढळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या अहवालांनंतरच हरिणावर हल्ला कोणी केला ? हे समजू शकणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम