अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Fig Farming : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अंजिरची लागवड (Fig Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राच्या एकूण अंजीर उत्पादनात (Fig Production) पुणे जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
जिल्ह्यातील (Pune) पुरंदर तालुक्यात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वाधिक अंजीर लागवड बघायला मिळते. पुरंदर तालुक्यात (Purandar) लावलेले अंजीर अर्थात पूना अंजीर (Puna Fig) आता परदेशात निर्यातीसाठी जात आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याची शान असलेले गोड आंबट अंजीर जर्मनीच्या बाजारपेठेत दाखल झाले होते. जर्मन वारीनंतर आता पूना अंजीर हॉलंड (Holland) या देशात निर्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येत्या दोन-तीन दिवसात पूना अंजीर अँमस्टरडमला निर्यात केले जाणार आहे. अँमस्टरडमच्या बाजारपेठेत पूना अंजीर पाठवण्यासाठी सर्व तयारी केली गेली आहे.
यानंतर आगामी बहाराचे देखील अंजीर निर्यातीसाठी पाठवले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने देखील तयारी प्रगतीपथावर असून या संबंधित पाठपुरावा आता अंतिम टप्प्यात आला आहे.
पूना जिल्ह्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या अंजीरच्या या जातीला पुना फिग म्हणुन ओळखले जाते. ही पूना फिग जातं भारतात मोठे प्रसिद्ध आहे.
आता या अंजिराने जर्मनीच्या व्यावसायिकांना देखील भुरळ घातली आहे आणि यामुळे येत्या काही दिवसांत निर्यातीसंबंधी मोठी घडामोड होण्याची शक्यता निर्यातदार व अंजीर उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, निर्यात करताना हवाई मार्गे वाहतुकीचा खर्च प्रति किलो 800 रुपये आहे. मात्र, सव्वा टनाची ऑर्डर असल्यास हाच खर्च 200 रुपयांपर्यंत येतो.
यामुळे अंजीर उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी परदेशातील निर्यातदारांना मोठ्या वजनाच्या ऑर्डर देण्यासंदर्भात बोलणी करीत आहेत.
जर्मनीच्या निर्यातदारांना देखील येत्या जानेवारी ते एप्रिल दरम्यान एवढ्या वजनाच्या ऑर्डर देण्याबाबत सांगितले जात आहे. याच काळात निर्यात का, असे विचारले असता उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, “हे पीक हवामानाला संवेदनशील असल्याने इतर वेळी उत्पादन चांगले असले
तरी त्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. यामुळे निर्यातीचे हे प्रयोग यशस्वी झाले असले तरी पुढील जानेवारीतच मोठ्या प्रमाणावर निर्यात होणार आहे.”
एकंदरीतच अंजीर निर्यात करण्यासाठी जानेवारी ते एप्रिल हा काळ चांगला असतो यामुळे पुढील जानेवारी ते एप्रिल मध्ये पुरंदरचे अंजीर मोठ्या प्रमाणात परदेशी बाजारपेठेत दाखल होतील यात तिळमात्रही शंका नाही.