समिती जिल्हाध्यक्षाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  माहिती अधिकार जनजागृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब यशवंत लोखंडे याने (रा. लोखंडे वस्ती, कोल्हार बुद्रूक) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित मुलीचे वडील एका गुन्ह्यात न्यायलयीन कोठडीत आहेत. पीडित मुलीची आई व भाऊ न्यायालयीन कामानिमित्त गेलेले असताना आरोपी लोखंडे हा सीसीटीव्ही कॅमेर्यातून पिडीत मुलीवर लक्ष ठेवून होता.

ती शौचालयातून बाहेर येताच लोखंडे याने विनयभंग केला.पाेलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश शिंदे अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe