अखेर संजय राऊत यांना अटक, आज न्यायालयात नेणार

Published on -

Maharashtra News : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी याला दुजोरा दिला. संजय राऊत यांना सोमवारी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येईल आणि त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले जाईल.

राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News