अखेर पारनेर तहसीलदारपदाचा भार यांच्या खांद्यावर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- पारनेर करांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे आता पारनेरसाठी नव्या तहलिसदारांची नेमणूक निश्चीत झाली आहे.

शिवकुमार मनोहर आवळकंठे यांची पारनेरच्या तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पारनेर तहसीलदारपदी नियुक्त आवळकंठे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते.

ते सोमवारी पारनेरच्या तहसिलदार पदाचा पदभार स्विकारणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती समजते आहे. यामुळे अखेर गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पारनेरचे तहसीलदारपद अखेर भरले गेले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पारनेरच्या तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर पारनेरच्या तहसिलदारपदाचा पदभार सुरूवातीस नायब तहसिलदार व त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तात्पुरता देण्यात आला होता.

पारनेरला गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण वेळ तहसिलदार उपलब्ध नव्हते. पारनेरच्या तहलिसदारपदी शिवकुमार आवळकंठे यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र, त्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्याने ही नियुक्ती रखडली होती.

त्याुळेच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तात्पुरता पदाभार देण्यात आला होता. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदरच्या आदेशावर सही केली.

त्यानंतर गुरूवारी राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी तहसिलदार आवळकंठे यांच्या नियुक्तीचा आदेश निर्गमित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe