Finance update : SBI ग्राहक असाल तर आनंदाची बातमी, FD वरील व्याजदरात झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- SBI ने नुकताच आपल्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानुसार तब्बल 40 कोटी ग्राहकांना त्याचा फायदा झाला आहे. SBI ने 7-45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.(Finance update)

त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर 3.40 टक्क्यांवरून 3.50 टक्के करण्यात आले आहेत. SBI ने 180-210 दिवसांच्या FD वरील व्याजदर 3 टक्क्यांवरून 3.10 टक्के केले आहेत.

त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर 3.50 टक्क्यांवरून 3.60 टक्के करण्यात आले आहेत. SBI ने 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वरील व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5 टक्के केले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर 5.40 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आले आहेत.

SBI ने 2 ते 3 वर्षांच्या FD वर 5.10 व्याजदर कायम ठेवले आहेत. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.60 टक्के राहतील. इतर व्याजदरही बँकेने स्थिर ठेवले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe