अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- सरते वर्ष 2021 संपले असून आपण आता नवं वर्ष 2022 मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. (bank)
आजपासून नेमके कोणते नियम बदले आहेत. त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, तर काही नियमांमुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. नेमके कोणते आहेत हे बदल जाणून घेऊया
लॉकरधारकांसाठी महत्वाचा नियम : आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार आता लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असणार आहे. लॉकरमधून एखादी वस्तू चोरीला गेल्यास ग्राहकाला संपूर्ण भरपाई मिळेल. याला अपवाद म्हणेज एखादे नैसर्गीक संकट जसे भूकंप, अतिवृष्टी, आग यामुळे जर नुकसान झाले तस संबंधित ग्राहकांना मात्र कोणतीही नुकसाई भरपाई मिळणार नाही.
एटीएमधारकांसाठी महत्वाची माहिती : प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना फ्री ट्राझेक्शनची मर्यादा ठरून दिली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक ट्राझेक्शनवर बँकेकडून त्यांच्या नियमाप्रमाणे चार्ज आकारला जाणार आहे. या नियमामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची अधिक शक्यता आहे.
ऑनलाई फूड डिलेव्हरी : ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपन्या असलेल्या स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांना देखील आता जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून ऑनलाईन फूड महागणार आहे. ऑनलाईन फूडची ऑडर देताना ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम