जाणून घ्या असे काय झाले ? कि सोन्याच्या मागणीने मोडला 7 वर्षांचा विक्रम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   गेल्या एक महिन्यात झालेल्या विवाहांमुळे सोन्याची मागणी जोरदार राहिली. त्याआधी सणासुदीच्या काळातही सोन्याला चांगली मागणी होती.(Gold Rate)

त्यामुळे २०२१ मध्ये सुमारे ९०० टन सोन्याच्या आयातीचा अंदाज आहे, तो प्रमाणाच्या हिशेबाने ७ वर्षांत सर्वाधिक आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकड्यांनुसार, तो गेल्या वर्षाच्या तुलनेत ३५० टन आणि २०१९ च्या तुलनेत ६९ टन जास्त आहे.

नोव्हेंबरच्या मध्यापासून आतापर्यंत देशात २५ लाखांपेक्षा जास्त विवाह झाले आहेत. त्यामुळे सोने-चांदी आणि दागिन्यांच्या बाजारात तेजी आहे. दीड वर्षापेक्षाही जास्त काळापर्यंत लग्नाच्या ग्राहकीसाठी ज्वेलर्स प्रतीक्षा करत होते.

ते आता वाढलेली मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षा कोविड महामारीमुळे धूमधडाक्यात होणाऱ्या लग्नांवर बंदी घातल्याने अनेक विवाह लांबणीवर पडले.

आता निर्बंध हटल्यानंतर विवाह समारंभ धडाक्यात सुरू आहेत. मेटल फोकसचे सल्लागार चिराग सेठ म्हणाले की, सोन्याचे दर घटल्याने विक्री वाढली आहे.

पण सोन्याची मागणी वाढण्याचे सर्वात मोठे कारण गेल्या वर्षीचे लांबणीवर पडलेले विवाह. या वर्षी विक्रमी संख्येने विवाह होत आहेत. भारतात सोन्याची खरेदी सण आणि लग्नसराईत म्हणजे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत उच्चांकावर असते.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार, या वर्षी डिसेंबर तिमाहीदरम्यान भारतात सोन्याची विक्री एक दशकाच्या तुलनेत विक्रमी प्रमाणात असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe