अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- महसूलविषयक कामकाज करतानाच कामासाठी येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने परत जाईल, यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी काम केले पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणुकीतून मिळणारा आनंद कामाचे समाधान देणारा असतो.
मात्र, त्यासाठी महसूलविषयक नियम, कायदे यांचा अभ्यास करुन विषयांच्या खोलाशी जाणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांनी केले. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागात विविध संवर्गात चांगले काम करणार्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुणगौरव रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी या अधिकारी – कर्मचारी यांचा मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,
नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहनचालक, शिपाई, कोतवाल, पोलीस पाटील या महसूल संवर्गातील विविध अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला, उपजिल्हाधिकारी संवर्गामध्ये पल्लवी निर्मळ (जिल्हा पुनर्वसन अधिकारी).
तहसीलदार संवर्गामध्ये प्रशांत पाटील ( तहसिलदार श्रीरामपूर) नायब तहसिलदार संवर्गामध्ये योगिता ढाले (श्रीगोंदा), अभिजीत वांढेकर (पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर), अव्वल कारकून संवर्गामध्ये सुभाष ठोंबरे (महसुल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर), अभया राजवाळ (राहुरी),
मंडळ अधिकारी संवर्गामध्ये बाबासाहेब गोसावी (श्रीरामपूर), विश्वेश्वर खेडकर (पाथर्डी), महसूल सहायक संवर्गामध्ये मंगेश ढुमणे (भूसंपादन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय) राहुल शिरसाठ ( कोपरगाव), तलाठी संवर्गामध्ये बाळकृष्ण सावळे (अकोले), सुजाता गुंजवटे (कर्जत), कृष्णा आरसेवार (राहाता),
वाहनचालक संवर्गामध्ये महोदव डोंगरे ( पुनवर्सन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), शिपाई संवर्गामध्ये हनुमान बोरगे (सामान्य प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय), कोतवाल संवर्गामध्ये भाऊसाहेब बोर्डे (पारनेर), शदर गोंधणे (शेवगाव), आकाश कर्पे (अहमदनगर), गणेश जाधव (संगमनेर),
पोलीस पाटील संवर्गामध्ये आदेश साठे (नेवासा), राजेंद्र गिते (जामखेड) यांना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांना सन २०२०-२१ साठी कोरोना योध्दा विशेष पुरस्कार तर प्रशांत हासे (तहसील कार्यालय, संगमनेर) यांना आदर्श तलाठी पुरस्कार-२०२१ देऊन गौरविण्यात आले.
काम करताना अधिकारी-कर्मचारी यांची मानसिकता ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारी असली पाहिजे. विषयांच्या खोलात जाऊन अभ्यासपूर्ण रितीने काम केले तर लवकर प्रश्न मार्गी लावू शकतात. वस्तुनिष्ठपणे परिस्थिती हाताळली तर प्रश्न सुटून त्याचे समाधान तुम्हाला मिळू शकते, असे डॉ. भोसले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
महसूल दिनापासून प्रत्येकाने ठरविले पाहिजे की, आपण ज्या पदावर काम करतो, त्यासाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडताना कामाचा आराखडा बनवून काम केले पाहिजे. कामे करण्यात दिरंगाई झाली की नकारात्मकता निर्माण होते. ते टाळण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम