राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच, आडनाव काय ते तर पहा…

Published on -

Maharashtra News:शिवसेनेतील बंडखोरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचत आहेत. आमदारा-खासदार, नगसेवक आणि इतर पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करीत आहेत.

मात्र, या गटाला अशीच एक संधी मिळाली. जळगाव जिल्ह्यात एका गावात सरपंचपदाची निवडणूक होती. ती या गटाने लढविली, त्यात यश आले आणि शिंदे गटाचा पहिला सरपंच झाला. या नवनिर्वाचित सरपंचाचे आडनाव आहे ठाकरे.

यमुनाबाई हिलाल ठाकरे या जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा गावाच्या सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत. योगायोग असा की ज्यांचे ज्या नेत्याचे नेतृत्व नाकारून हा गट फुटला, त्याच नेत्याच्या आडनावाचा सरपंच झाला आहे.

शिंदे गटाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट गावातील सरपंच निवडून आणण्याची संधी या गावात या गटाला मिळाली. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात ही निवडणूक झाली.

राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. कुसुंबा ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या विजयी झाल्या. त्यामुळे आता शिंदे गटात प्रवेश केलेल्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News