Ahmednagar: पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) बिबट्याची (Leopard) दहशत सुरु झाली आहे. पारनेर ( Parner) तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा जागीच ठार केले आहे. बुधवारी (दि 22) मध्यरात्री ही घटना घडली आहे .
तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास होते. बुधवारी सांयकाळ पासून पावसाची रिमझिम सुरूच होती. पहाटेपर्यंत ही रिमझिम सुरूच होती. रिमझिम पावसाने शेतकर्यांचे पाळीव कुत्रे देखील आडोशाला बसले असल्याने बिबट्याने या कळपावर हल्ला केला.

शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने व कुत्रे भुकायला लागल्याने हा प्रकार शेतकर्यांच्या लक्षात आला. यामध्ये 5 पाळीव मेंढ्या जखमी होऊन मृत्यमुखी पडल्या. सुमारे 30 ते 35 हजारांची नुकसान शेतकर्याची झाली असून तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झावरे व वनविभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला.