Flipkart Black Friday Sale : या सेलदरम्यान फ्लिपकार्ट स्मार्टफोनवर मोठमोठ्या ऑफर्स देत आहे. त्यामुळे जर तुम्ही या संधीचा फायदा करून घेतला तर तुम्हाला कमी किमतीमध्ये महागडा स्मार्टफोन मिळू शकतो.
दरम्यान, फ्लिपकार्टचा ब्लॅक फ्रायडे सेल फक्त तुमच्यासाठी आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही 549 रुपयांमध्ये स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता.
सेलमध्ये, तुम्हाला CITI आणि ICICI बँक कार्ड्सवर 12% पर्यंत झटपट सूट मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर.
infinix smart 6 hd
या सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या स्मार्टफोनचे नाव infinix smart 6 hd हे आहे. सेलमध्ये 33% डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 5,999 रुपये झाली आहे. बँक ऑफर्समुळे हा फोन 2,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.
कंपनी या फोनवर 5,450 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे. अशा परिस्थितीत, जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज मिळाल्यावर, हा फोन तुमचा 5,999 – 5,450 रुपयांमध्ये म्हणजेच 549 रुपयांचा असू शकतो.
मायक्रोमॅक्स IN 2C
यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला मायक्रोमॅक्स IN 2C हा स्मार्टफोन येतो. Micromax फोन 3 GB रॅम आणि 32 GB अंतर्गत स्टोरेजमध्ये येतो. त्याची किंमत 9,499 रुपये आहे, परंतु तुम्हाला ती 5,999 रुपयांना सेलमध्ये मिळेल.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना या फोनवर फोन खरेदी केल्यास 5% कॅशबॅक देखील मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.52 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह 8 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल.
मोटो E40
तसेच या ऑफरमध्ये तिसऱ्या क्रमांकाला मोटो E40 हा स्मार्टफोन येतो. 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 10,999 रुपये आहे. सेलमधील या डिस्काउंटनंतर त्याची किंमत 8,299 रुपये झाली आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला फोनवर 2,000 रुपयांपर्यंतचा आणखी फायदा मिळू शकतो.
या मोटो फोनवर 7,750 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. हा फोन 6.5 इंच HD+ डिस्प्ले सह येतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देत आहे.
Realme C33
यासोबतच या ऑफरमध्ये शेवट असणारा Realme C33 हा स्मार्टफोन. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 11,999 रुपये आहे. रु.8,999 मध्ये विक्रीमध्ये ते तुमचे असू शकते.
बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला फोनच्या खरेदीवर 1,000 रुपयांची आणखी सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन 8,400 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.