Health Tips : बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समस्या सध्या खूप सामान्य झाली आहे. ही समस्या जरी सामान्य असली तरी ती खूप गंभीर आहे. सतत या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
वाढत असलेल्या जबाबदाऱ्या आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जाणून घेऊयात तज्ञांचा सल्ला.
दारूपासून लांब राहा
दारू पिण्याच्या सवयीमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. दारूमुळे फक्त यकृताचे नाही तर हृदयाच्या स्नायूंच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढत जातो. तसेच दारूमुळे चिंता-तणाव यांसारख्या आजारांचाही धोका वाढतो.
सकस आहार
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारातील पोषणाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला आहार घेतला तर ऊर्जा प्रदान करण्यासोबतच संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी फायदेशीर आहे. मन शांत ठेवण्यासाठी आणि विचार करण्याची तसेच लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी आहारातील पोषण खूप गरजेचे आहे.
योगा आणि व्यायामचे फायदे
रोजच्या व्यायामाच्या सवयीचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. नियमित योगा आणि व्यायाम करणाऱ्यांमध्ये हृदयविकार,मधुमेहाचा धोका कमी असतो. तसेच मन शांत आणि तणावापासून संरक्षण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. योगासनामुळे गंभीर आजारांचा धोका कमी तर नैराश्याच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांना आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे.
पुरेशी झोप
दररोज 6-8 तासांची झोप घेणे खूप गरजेचे आहे. कारण पुरेशी झोप न मिळाल्याने हृदय आणि चयापचयाशी निगडित आजार होण्याचा धोका जास्त असतो. ज्यांची झोप पूर्ण न होणाऱ्यांमध्ये मानसिक आजारांचा धोका जास्त दिसून आला आहे. चांगली झोप तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यासाठी तसेच मन शांत आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.