“लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं”; सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना खोचक चिमटा

Published on -

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साताऱ्यातील महाराष्ट्रा (Maharashtra) विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly elections) पावसात झालेली सभा भाजप (BJP) नेत्यांच्या तोंडवळणी पडलेली दिसत आहे. शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त फायदा झाला आहे. मात्र भाजप नेते आता याच सभेवरून शरद पवार यांना टार्गेट करत असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही शरद पवार यांच्यावर याच सभेवरून त्यांना टोला लगावला आहे.

ते म्हणाले, पवारांच्या पावसातल्या सभेने निवडूण आलो म्हणून सांगता, तर लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं असा टोला मुनगंटीवारांनी शरद पवारांना लगावला आहे.

या निडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडूण येऊनही भाजप सत्तेपासून वंजित राहिली. मात्र लोकांनी त्यावेळी आम्हालाच निवडूण दिले होते, पण शिवसेनेने (Shivsena) बेईमानी केल्याने आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

शिवसेनेची संभाजीनगर असे औरंगाबादचे नाव बदलण्याची सिंह गर्जना कुठे गेली? 1988 मध्ये बाळासाहेबांनी सांगितलं होतं हे माझं वचन आहे. कुठे गेल ते वचन? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून धारेवर धरले.

नवाब मालिकांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकत नाही दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता, तसेच खरंच MIM च्या विरोधात असाल तर करा संभाजीनगर नाव दोन दिवसात असे आव्हानही सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe