राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक होणार?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस काढलेली आहे, असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे.

देशमुखांना लवकरच अटक होणार, असं जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. दरम्यान अनिल देशमुख यांनी देश सोडून जाऊ नये, यासाठी लूक आउट नोटीस बजावण्यात येते.

लूक आउट नोटीस जारी करण्यात आल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ईडीने 100 कोटींच्या कथित वसूली प्रकरणात लूकआऊट नोटीस काढलेली आहे.

याआधी ईडीने देशमुखांना पाचवेळा समन्स पाठवलं होतं. मात्र, चौकशीला हजर न राहिल्याने आता लूकआऊट नोटीस काढण्यात आल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे.

त्यामुळे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना खरंच अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे.

जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल”, असं अ‍ॅड. जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe