Ayushman Card : आयुष्यमान भारत कार्ड काढून जनतेने आरोग्याच्या सुविधांचा लाभ घ्यावा. तालुक्यातील १ लाख ६९ हजार नगरिकांना हे कार्ड देण्यात येणार आहे. शहरात ३५८२८ नागरिकांना हे कार्ड देण्यात येईल.
मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल.
आतापर्यंत शहरात ५९५४ लोकांनी तर ग्रामिण भागात ५३८५७ लोकांनी हे कार्ड काढले आहे. राहिलेल्या लोकांनी तातडीने हे कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांनी केले आहे.
तालुक्यात १६९००० लोकांना हे कार्ड ग्रामिण भागात देण्यात येणार असून, त्याची यादी पंचायत समितीने प्रत्येक गावात दिली आहे. ग्रामिण भागात ५३८५७ लोकांनी हे कार्ड काढले आहे. हे काम केवळ ३३ टक्के झाले आहे.
शहरात ३५८२८ नागरीकांना हे कार्ड देण्यात येणार आहे. आतापर्यंत शहरात ५९५४ लोकांनी कार्ड काढले आहेत. हे काम केवळ १७ टक्के आहे. आयुष्यमान भारत योजनेत नगर शहरातील बहुतेक चांगली रुग्णालये जोडलेली आहेत.
पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्याचा खर्च मोफत केला जाणार आहे. सरकारची ही योजना चांगली आहे. नागरिकांनी ग्रामसेवक, आरोग्य सेविक, आशा स्वंयसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
विद्यालये, महाविद्यालये, प्राथमिक शाळा येथे मुलांनी हे कार्ड काढण्याचे काम करावे. स्वतःच्या मोबाईलवरुनदेखील हे कार्ड काढता येते. गावातील युवकांनी याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मदत कावी. हे कार्ड मिळाले तर आरोग्याचा खर्च वाचणार आहे. महागडे उपचार मोफत मिळतील, असे आवाहन पालवे यांनी केले आहे.