मुंबई : एरवी भाजप (BJP) नेते महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर तुटून पडलेले दिसतात. आरोप करतात टीका करतात मात्र आता भाजप नेते प्रसाद लाड (prasad Laad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.
प्रसाद लाड यांचा सदस्यत्वाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला त्यावेळी त्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.
प्रसाद लाड म्हणाले, राजकारणात शरद पवार, अजित दादा, छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मला संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड यांनी जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, हमाली करण्यासून ते आमदार होण्यापर्यंत काय-काय खस्त्या खाल्ल्या याची माहिती दिली. लग्नाची आठवण सांगताना त्यांचा चेहरा पाहण्याजोगा होता.
म्हणाले, आपण विधानपरिषद सदस्याच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला. लग्नासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असल्याची अट होती. मी 19 व्या वर्षी लग्न केलं आणि 21 व्या वर्षी मुलगी झाली.
पुढे बोलताना ते म्हणाले, जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी 31 व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे तिथे विश्वस्त होते. वडील 1968 मध्ये शिवसैनिक होते.
परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं. माझ्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले.
त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचं. असे सांगत प्रसाद लाड जुन्या आठवणीत रमल्याचे दिसून आले.
त्याकाळी बाबुराव भापसे यांची मुलगी मुंबईतून पळवून नेऊन लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो.
त्याचे 70 रुपये मला मिळायचे. त्यापैकी 40 रुपये बायकोला द्यायचो आणि 30 रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघर्षातून सगळं मिळवलं.
पुढे राजकारणात सक्रिय झाले. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी जी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं केलं असेही लाड म्हणाले.