Ganapati visarjan 2021: गणपती बाप्पाचे विसर्जन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सवाचा दहा दिवस आनंद साजरा केल्यानंतर अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येते,बाप्पाचं विसर्जन करताना मन अतिशय निराश होतं, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात अनंत बांधतात. चला आपण या सणाबद्दल तपशीलवार माहिती घेऊया आणि या दिवशी गणपती विसर्जन का केले जाते हे देखील जाणून घेऊया.

गणपती विसर्जनावेळी ह्या गोष्टी लक्षात ठेवा

– घरातून गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाताना बाप्पाच्या मूर्तीचा चेहरा घराच्या आतील बाजूस असावा.

– विसर्जन करण्यापूर्वी जाणूनबुजून किंवा अजाणतेने झालेल्या चुकांबाबत बाप्पाकडे क्षमा मागावी. तसंच बाप्पाकडे प्रार्थना करा की तुमच्या घरात सदैव सुख-समृद्धी राहावी.

– विसर्जनापूर्वी नदी किंवा तलावाच्या काठावर गणपती बाप्पाची पुन्हा एकदा आरती करा. त्यानंतर आदराने बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करा.