४२ इंच स्मार्ट टीव्ही मिळवा अवघ्या ८ हजारात; जाणून घ्या ऑफर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Big Saving Days Sale तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये Blaupunkt च्या ३० हजार रुपयांच्या ४२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स
हा TV हा अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट सारखे फीचर्स दिले आहेत.
हा टीव्ही ४२ इंच फुल एचडी एलईडी डिस्प्लेसह येतो.
याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.
नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील मिळेल.

नेमकी काय आहे ऑफर? जाणून घ्या
Blaupunkt Cybersound या TV ची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये स्मार्ट टीव्ही ३३ टक्के डिस्काउंटनंतर १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

कॅशबॅक ऑफर : तुम्ही या टीव्हीला एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास १० टक्के म्हणजेच १,२५० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. अशाप्रकारे टीव्हीची किंमत कमी होवून १८,७४९ रुपयांवर येईल.

एक्सचेंज ऑफर : या टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत आहे. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ७,७४९ रुपयात तुमचा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe