LIC Jeevan Pragati Plan: एलआयसी अनेक योजना चालवते. त्यापैकी एक म्हणजे जीवन प्रगती योजना. या योजनेत जर तुम्ही दररोज 200 रुपये किंवा महिन्याला 6000 रुपये गुंतवून 28 लाख रुपयांचा निधी उभारू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेत 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी एलआयसीची जीवन प्रगती योजना काय आहे ते जाणून घेऊयात.

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रोज 200 रुपये गुंतवावे लागतील किंवा दरमहा 6 हजार रुपये गुंतवावे लागतील. संपूर्ण 20 वर्षे या योजनेत तुम्हाला पैसे गुंतवावे लागणार आहेत.
तरच तुम्ही 28 लाख रुपये निधी मिळवू शकाल. या पैशाने तुम्ही तुमच्या भविष्याशी निगडीत काही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकाल.
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळतील. तुम्हाला डिसेबिलिटी रायडरचा लाभ घेता येईल.
समजा या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू झाला तर मूळ विमा रकमेच्या 100 टक्के रक्कम त्या नॉमिनीला दिली जाते. एकीकडे या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला विमा संरक्षणासह जोखमीचा लाभ मिळत आहे. तर दुसरीकडे, या योजनेत तुम्ही नियमितपणे प्रीमियम भरला तर मृत्यू लाभाचा फायदा मिळेल.