मुंबईतील कुर्ला परिसरात मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता व त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. त्यानंतर जे समोर आलं ते पाहून पोलिसही थक्क झाले. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्या महिलेची हत्या केल्याचे समोर आले.
त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, तो प्रियकर महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी तो मृतदेह सुटकेस मध्ये भरून ती सुटकेस घेऊन तो मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने दीड तास फिरत होता. अस्कर मनोज बरला (२२) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने हा खून का व कसा केले याबाबत देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशी झाली हत्या
प्रतिमा किसपट्टा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ती महिला आरोपीसोबत २०२१ पासून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये आहेत. महिनाभरापूर्वीच तिने अस्कर याला बेंगळुरुवरून मुंबईत बोलावले होते. तो तिच्या सांगण्यावरून आलाही. तो एका मिठाईच्या दुकानात कामालाही लागला. परंतु प्रतिमा मित्रांसोबत सतत चॅटिंग करत असल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला.
त्याने तिला हे थांबवायला लावले. परंतु तिने काही ऐकले नाही. चारित्र्याच्या संशयातून दोघांत खटके उडायला लागले. हा वाद टोकाला गेला आणि त्याने तिची गळा दाबून हत्या केली. मृतदेह सुटकेसमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
दीड तास सुटकेस मध्ये मृतदेह घेऊन सुरु होता थरार
आरोपी सुटकेसमध्ये मृतदेह घेऊन पायी पायी सायन सर्कल येथे आला. त्यानंतर तो रिक्षाने लोकमान्य टिळक टर्मिनसला गेला. परंतु तेथे गर्दी होती. तो पुन्हा माघारी फिरला. विविध ठिकाणी दीड तास भटकल्यानंतर तो कुर्ला येथील मेट्रो रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी आला. त्याला तेथे अंधार दिसला. त्याने तोटेच मृतदेह टाकून पळ काढला.