आज कांद्याला किमान चार हजार रुपये भाव देणे अपेक्षित आहे !

Balasaheb Thorat

ग्राहकाला फुकट वाटा पण गरिब शेतकऱ्यांना मारू नका. त्याच्या उत्पादन खर्चाला तरी भाव दिला गेला पाहिजे. आज कांद्याला किमान चार हजार रुपये भाव देणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगर तालुक्यातील खडकी या ठिकाणी थोरात यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, किसनराव लोटके, जयंत वाघ, संपतराव म्हस्के, सरपंच प्रविण कोठुळे, शरद कोठुळे, राहुल बहिरट आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले की, कांदा हे जीरायत पीक आहे. शेतकऱ्यांना आता चार पैसे जास्त मिळायला लागले आहेत. त्याच्यावर त्याचे कुटुंब चालत आहे. त्याचा चरित अर्थ चालत आहे. शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळायला लागल्यावर लगेच निर्यात बंदी करून टाकली.

वास्तविक पाहता उत्पादन खर्च हा पंचवीसशे रुपयांच्या पुढे गेलेला आहे व तेवढा तरी भाव किमान मिळायला पाहिजे असे आता होताना दिसत नाही तुम्ही त्याचा उत्पादन खर्च देण्यास सुद्धा तयार नाही. शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे टोमॅटोचे बाजार वाढले मग केंद्र सरकारने नेपाळवरून टोमॅटो आयात केला असे ते म्हणाले.

केंद्राना ग्राहकांना सांभाळायचं असेल तर निश्चितपणे सांभाळा त्याबद्दल दुमत नाही पण दुसरीकडे शेतकऱ्यांना मारू नका असेही ते म्हणाले. पण आता शेतकऱ्यांना मारायचं व ग्राहकांना स्वस्त करायचं असा उद्योग यांचा चालू आहे. शेतकऱ्याचे जीवन कठीण झालेलं आहे. आत्महत्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत ही सुद्धा बाब गंभीर आहे.

कांद्याच्या भावावरून मतांचा राजकारण आहे का असे विचारलं थोरात यांनी, ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायची आमची बिलकुल अडचण नाही तुम्ही फुकट वाटा आमचे काही म्हणणं नाही, पण शेतकऱ्यांना मारून काय करणार असा सवाल थोरात यांनी उपस्थित करत

वास्तविक पाहता तुम्ही अनुदान हे शेतकऱ्याला किंवा ग्राहकांना दिले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. शेतकरी हा जगला पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे त्याला मारून स्वास्थ्य आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी यायला लागली.

थोरात म्हणाले की, जे देशांमध्ये राज्यामध्ये मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. बेरोजगारी महागाई हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. मुलांना एकीकडे काम नाही यावर कुणीही बोलायला तयार नाही,

महागाईवर बोलायला तयार नाही एकीकडे लोकशाहीची गळचेपी होत चालली आहे. मणिपूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. जगात बेइज्जती झाली आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते असे नवीन प्रयोग करत असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe