GK Questions Marathi : सरकारी नोकरीची (Government job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना (candidates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान (general knowledge) असणे अत्यंत आवश्यक आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा (Competitive Examination) सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका (Question paper) सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (interview) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : ऑस्कर पारितोषित मिळवणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर : भानु अथेय्य
प्रश्न : भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते आहे?
उत्तर : सत्यमेव जयते
प्रश्न : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो?
उत्तर : नायट्रोजन
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्याची राजभाषा इंग्रजी आहे?
उत्तर : नागालँड
प्रश्न : जागतिक दहशदवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
उत्तर : ११ सप्टेंबर
प्रश्न : भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे?
उत्तर : बँगलोर
प्रश्न : शंभू महादेवाच्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : सातारा