Gold Price Update : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कमी झाल्या सोन्या-चांदीच्या किमती, जाणून घ्या नवीन दर

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोने किंवा चांदीच्या खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे.

दरम्यान आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेकांच्या या बजेटकडे नजरा खिळल्या आहेत. परंतु, त्यापूर्वी सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली आहे. मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 214 रुपयांनी स्वस्त होऊन 56865 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 110 रुपयांनी घसरून 57079 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

तसेच मंगळवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण नोंदवली आहे. चांदीचा भाव 478 रुपयांनी घसरून 7671 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर सोमवारी चांदीचा दर 43 रुपयांनी घसरून 68149 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

नवीन सोन्याचे दर

या घसरणीनंतर 24 कॅरेट सोने 214 रुपयांनी स्वस्त होऊन 56865 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 213 रुपयांनी स्वस्त होऊन 56637 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 196 रुपयांनी स्वस्त होऊन 52088 रुपयांवर तर 18 कॅरेट सोने 160 रुपयांनी स्वस्त 42649 रुपयांवर आहे. 14 कॅरेट सोने 125 रुपयांनी स्वस्त झाल्याने 33266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे.

सोने 500 रुपयांनी तर चांदी 12300 रुपयांनी स्वस्त

सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 497 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. 24 जानेवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 57362 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी अजूनही 12309 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

हे सोने असते सर्वात शुद्ध

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते, परंतु ते खूप मऊ असल्याने या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे.22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात, बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe