अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.4 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.
या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव –
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,614
8 ग्रॅम 36,912
10 ग्रॅम 46,140
100 ग्रॅम 4,61,400
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,034
8 ग्रॅम 40,272
10 ग्रॅम 50,340
100 ग्रॅम 5,03,400
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,070 47,070
पुणे 45,170 48,620
नाशिक 45,170 48,620
अहमदनगर 45,180 47,440
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम