अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-तरराष्ट्रीय किमतीतील घसरणीमुळे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत, सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 291 रुपयांची घट झालीय.
त्याचबरोबर औद्योगिक मागणीतील कमकुवतपणामुळे चांदीचे दरही घसरले. एक किलो चांदीची किंमत 1,096 रुपयांनी घसरली. शुक्रवारी सोन्याच्या किमती खाली आल्या.
शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,350 रुपयांवरुन 44,059 वर आली.
अशा प्रकारे आज सोन्याच्या किमतीत 291 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची किंमत प्रति औंस 1,707 डॉलरवर गेली.
कमी औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमती शुक्रवारी 1 हजार रुपयांपेक्षा खाली आली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचा दर 67,054 रुपयांवरून घसरून 65,958 रुपये प्रतिकिलोवर आला.
चांदी 1,096 रुपयांनी घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी कमकुवत राहिली आणि किंमत प्रति औंस 25.67 डॉलरवर गेली.
ऑगस्ट 2020 मधील सोन्याच्या किंमती 56,200 च्या सर्वोच्च पातळीवर गेली होती. ती जवळजवळ 20 टक्के म्हणजेच 13 हजारांनी घसरली आहे.
2021 मध्ये सोन्याचे उच्च स्तरावरून स्वस्त दरात 5,000 रुपयापर्यंत घसरले आहे. अक्षय तृतीया 14 मे रोजी आहे. त्याआधी सोन्याच्या किमती खाली आल्यामुळे खरेदीदारांसाठी मोठी संधी आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|