Gold Price : शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात (bullion market) सोन्याचा भाव (Gold Price) 1,088 रुपयांनी वाढून 51,458 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. त्यामुळे मागील व्यवहारात सोन्याचा भाव 50,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, चांदीचा (Sliver) भाव 411 रुपयांनी घसरून 58,159 रुपये किलो झाला.
जाणून घ्या काय आहे सोन्याचा नवा भाव

गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव 58,570 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “भारताच्या सोन्याच्या आयात शुल्कात पाच टक्क्यांनी वाढ केल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत रु. 1,088 ने वाढली.”
सोन्याचा भाव 1,794 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदी $19.76 प्रति औंस वर जवळपास स्थिर राहिले.
सोने विक्रमी दरापेक्षा खूपच स्वस्त झाले
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला होता. या सार्वकालिक उच्च दराची आजच्या किमतीशी तुलना करा, तर सोने 3,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह विकले जात आहे.