Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण मागील दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात खूप मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशातच आज नवीन व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस आहे.
मागच्या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले होते. त्यामुळे आज सोन्या-चांदीच्या किमती काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर नवीन दर जाणून घेऊन खरेदी करा.
मागील अनेक आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावाकडे सर्वांचे लक्ष आहे.
आज जाहीर होणार दर
आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत असून शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यामुळे आज नवीन व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे लक्ष असणार आहे.
शुक्रवारी होते हे दर
शुक्रवारी, या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, सोने प्रति 10 ग्रॅम 253 रुपयांनी स्वस्त होऊन 56175 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांच्या वाढीसह 56428 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
तर दुसरीकडे, शुक्रवारी चांदीच्या दरात घसरण नोंदवली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 889 रुपयांनी घसरून 64500 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 431 रुपयांनी घसरून 65389 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
जाणून घ्या नवीनतम दर
24 कॅरेट सोने 253 रुपयांनी स्वस्त होऊन 56175 रुपये, 23 कॅरेट सोने 252 रुपयांनी स्वस्त होऊन 55950 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 232 रुपयांनी स्वस्त होऊन 51456 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 190 रुपयांनी स्वस्त होऊन 4213 रुपये झाले. 14 कॅरेट सोने 148 रुपयांनी स्वस्त होऊन 32862 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार होत आहे.
स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी
या घसरणीनंतर, सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 2707 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. या अगोदर मागच्या वर्षी म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर होता. तसेच चांदी अजूनही 15480 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.
सर्वात शुद्ध सोने
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते, हे सोने मऊ असल्याने या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. म्हणूनच दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे.
तर 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात. तर 24 कॅरेट सोने चमकदार असते, परंतु त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.